ITI Form 2023: कसा भरायचा आयटीआय ऑनलाईन फॉर्म?
महाराष्ट्र आयटिआय फॉर्म 2023 कसा भरायचा?
ITI Form 2023 |
DVET – (व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय) मुंबई, महाराष्ट्र आयटीआय फॉर्म 2023 आज पासून अर्ज सुरू होत आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय मुंबई या अधिकृत वेबसाइट वर सर्व माहिती प्रकाशीत केली आहे. ज्यामध्ये अर्ज प्रक्रिया, पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि सर्वसाधारणपणे प्रवेश प्रक्रियेची इतर संबंधित माहिती समाविष्ट आहे. महाराष्ट्र व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाची प्रथम गुणवत्ता यादी हि 20 जुलै 2023 रोजी सायं (5:00pm) जारी केली जाईल आणि मगच पुढील प्रक्रिया पार पडेल. आणि आयटीआय फॉर्म 2023 अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे, महत्वाच्या तारखा प्रवेश फेऱ्या किती होणार हे सर्व खाली सविस्त्र पद्धतीत दिले आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
ITI Form 2023: कसा भरायचा आयटीआय
ऑनलाईन फॉर्म?
📌ITI Form Date
DVET महाराष्ट्र ITI प्रवेश 2023 प्रक्रियेसाठी महत्वाच्या तारखा दिल्या आहे. ऑनलाइन फॉर्म कधी सुरू होणार आणि प्रवेश प्रक्रिया कधी संपणार ऑनलाईन फॉर्म मध्ये बदल कधीपासून करता येणार. या संदर्भात महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. DVET महाराष्ट्र ITI मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्या आधी खालील सर्व तारखा पाहूण घेणे मगंच आपला ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
- अर्ज करण्याची सुरुवात: १२ जून २०२३ (सकाळी ११:००)
- अर्ज (Edit) संपादित करा: १२ जून २०२३ ते ११ जुलै २०२३ (सायंकाळी ५:००)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जुलै २०२३ (सायंकाळी ५:००)
- अर्ज (Confirmation) निश्चित करणे: १९ जून २०२३ (सकाळी १:००) ते १२ जुलै २०२३ (सायंकाळी ५:००)
••••••••••••••••••••••••••••••••••
ITI Form 2023
📌ITI Form 2023 fees (प्रवेश अर्ज शुल्क):
प्रत्येक प्रवर्गा साठी शुल्क खाली सूचीबद्ध केले आहे. हे मागील वर्षाच्या डेटावर आधारित आहे. या मध्ये काही बदल असल्यास, आम्ही तुम्हाला सूचित करू
- अनारक्षित श्रेणी: रु. १५०
- आरक्षित श्रेणी: रु. १००
- महाराष्ट्र राज्याबाहेर: रु. ३००
- जे भारतीय भारतात राहत नाहीत: रु. ५००
📌Important Documents (महत्वाची कागदपत्रे):
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- दहावीची गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र
- उत्पनचा दाखला
- आधार कार्ड आणि पासपार्ट आकार फोटो इत्यादी.
••••••••••••••••••••••••••••••••••
ITI Form online
📌ITI 1st Merit List (पहिली प्रवेश फेरी):
ITI महाराष्ट्र राज्य प्रवेश 2023 पहिली प्रवेश फेरीसाठी निवड यादी 20 जुलै 2023 रोजी सायं (5:00pm) वाजेपर्यंत तुमच्या Registered Mobil number वर SMS द्वारे तुम्हांला कळवले मग पहिल्या प्रवेश फेरी मध्ये निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र आणि ऑमिशन शुल्कसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. उमेदवारांने सादर केलेल्या पसंतीक्रमांकांच्या पहिल्या विकल्पानुसार प्रवेश मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला नाही तर त्या उमेदवारांस दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेरी मध्ये सहभागी होता येणार नाही.
••••••••••••••••••••••••••••••••••
📌ITI 2nd Merit List (दुसरी प्रवेश फेरी):
📌ITI 3rd Merit List (तिसरी प्रवेश फेरी):
तिसरी प्रवेश फेरी 1 ऑगस्ट 2023 पासून 4 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. तिसऱ्या प्रवेश फेरी करीता तुमचे पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या तिसऱ्या प्रवेश फेरी मध्ये ग्राह्य धरले जाईल. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड यादी 1 ऑगस्ट 2023 रोजी (5:00 pm) वाजेपर्यंत तुमच्या Registered Mobil number वर SMS द्वारे तुम्हांला कळवले मग तिसऱ्या प्रवेश फेरी मध्ये निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र आणि ऑमिशन शुल्कसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. उमेदवारांने सादर केलेल्या पसंतीक्रमांकांच्या पहिल्या पाच विकल्पानुसार प्रवेश मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला नाही तर त्या उमेदवारांस चौथ्या प्रवेश फेरी मध्ये सहभागी होता येणार नाही.
••••••••••••••••••••••••••••••••••
📌ITI 4th Merit List (चौथी प्रवेश फेरी):
ITI Admission Online Registration
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हांला माहित नसेल पाचवी प्रवेश फेरी असते त्याला आपण समुपदेशन फेरी असे म्हणतो. हि समुपदेशन फेरी देखील असते. या समुपदेशन फेरी मध्ये आपल्या पूर्वीच्या प्रवेश फेरी पेक्षा थोडी वेळी असते. या समुपदेशन फेरी मध्ये पूर्वीच्या प्रवेश फेरी मध्ये जसे कि वेगवेगळया संस्थेमध्ये पहिल्या व चौथ्या प्रवेश फेरी मध्ये शिल्क राहिल्याल्या जागा असताता. त्या पाचव्या (समुपदेश) प्रवेश फेरी मध्ये भरल्या जातात. या पाचव्या (समुपदेश) प्रवेश फेरीसाठी तुम्हांला नवीन अर्ज भरावा लागत नाही. जो पूर्वीचा तुम्ही अर्ज भरलेला होता तोच येथे ठेवायचा आणि पुढील पाचवी (समुपदेशन) प्रवेश फेरीसाठी तुम्हांला 27 ऑगस्ट 2023 ते 28 ऑगस्ट 2023 पर्यंत संस्थेत जावून किंवा ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. आणि मग पाचव्या (समुपदेश) प्रवेश फेरीसाठी निवड प्रक्रिया कोठल्या संस्थेत राहणार त्याची वेळ काय राहणार हे सर्व 29 ऑगस्ट 2023 (5:00 pm) वाजेपर्यंत तुमच्या Registered Mobil number वर SMS द्वारे तुम्हांला कळवले. आणि मग दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलविणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जाग, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे. हि समुपदेशन प्रवेश फेरी दिनांक 30 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल मग तुम्ही निवडलेल्या व्यवसाय चे ऑडमिशन प्रक्रिया चालू होते. मग उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र आणि ऑमिशन शुल्कसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
📌Important Links (महत्वाच्या लिंक):
- Apply Now: Registration
- Notification: Click Here
- Official Website: Click Here
- Other Form: Click Here
••••••••••••••••••••••••••••••••••
ITI Form Apply
📌ITI Form Fill up 2023 (फॉर्म भरण्यासाठी येथे स्टेप आहेत):
आईटीआई ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली ९ स्टेप्स दिल्या आहेत. त्या स्टेप्स पाहून तुम्ही आईटीआईचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
१) सर्व प्रथम तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जा.
२) नवीन नोंदणी बटण' निवडा आणि तुमचा फोन नंबर, नाव, जन्मतारीख आणि ईमेल पत्ता यासारखी सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
३) तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी ‘नोंदणी करा’ हा पर्याय निवडा.
४) 'उमेदवार लॉगिन' पृष्ठावर जा आणि ‘ऑनलाइन अर्ज करा’ पर्यायावर क्लिक करा.
५) तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, पालक माहिती, आणि पुढे जा.
६) उमेदवाराचे हमीपत्र तयार केले जाते, ज्यावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
७) तुमचा पसंतीचा ट्रेड निवडा आणि पुढील बटण दाबा.
८) तुमच्या श्रेणीनुसार, तुमची नोंदणी फी ऑनलाइन भरा.
९) आता 'सबमिट' बटण दाबा.
FAQ
१) मी महाराष्ट्रात आयटीआय साठी अर्ज कसा करू शकतो?
तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता. ऑलनलाईन अर्ज भरून झाल्यावर शासनाने ठरवून दिलेल्या अर्ज शुल्क नुसार ती अर्ज शुल्क भरून कोणत्याही आयटीआय मध्ये Confirmation करणे अतिशय महत्वाचे आहे. या प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
२) महाराष्ट्रात आयटीआय प्रवेशासाठी वयोमर्यादा किती आहे?
महाराष्ट्रात आयटीआय प्रवेशासाठी वयोमयार्दा हि 16 ते 40 वयो वर्ष आहे.
३)आयटीआय मध्ये कोणता कोर्स सर्वोत्तम आहे?
आयटीआय मध्ये सर्वच कोर्स सर्वत्तम आहेत. ते आपल्या इंट्रेस वर अवलंबून असते, तरीही काही कोर्स तुम्हांला सांगतो इलेक्ट्रीशियन, कोपा, वायरमन, फिटर, मशिनिस्ट आणि डिटीपीओ इत्यादी कोर्स आहेत.
४) आयटीआय मध्ये सर्वाधिक जास्त पगार देणारी नौकरी कोणती आहे?
आयटीआय मध्ये सर्वाधिक पगार देणारी नौकरी हि डेप्यूटी जनरल मॅनेजर हि आहे ज्याचे पगार 17.2 लाख प्रति वर्ष आहे. शीर्ष 10% कर्मचारी प्रति वर्ष 8.97 लाखांपेक्षा जास्त कमावतात. शीर्ष 1% प्रति वर्ष तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त कमावतात.
५)आयटीआय नंतर कोणती नौकरी सर्वोत्तम आहे?
आयटीआय नंतर विविध नौकऱ्या आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, वेलडिंग, रेफ्रिजरेशन आिा एअर कंडिशनर मेकॅनिक ही खासगी नौकरी आयटीआय नंतर सर्वत्त्म आहेत.
६)आयटीआयचा सर्वात कमी पगार किती आहे?
आयटीआय मध्ये सर्वांत कमी पगार हा 1.8 लाख प्रति वर्ष असा पगार असतो.
७)आयटीआयची अधिकृत वेबसाइट काय आहे?
आयटीआयची अधिकृत वेबसाईट admission.dvet.gov.in हि आहे.
८) महाराष्ट्र आयटीआय प्रवेश 2023 ची शेवटची तारीख काय आहे?
महाराष्ट्र आयटीआय प्रवेशासाठी शेवटची तारीख 11 जुलै 2023 हि होती परंतु आता DVET च्या अधिकृत वेबसाईट वर 15 जुलै 2023 ही शेवटची तारीख जाहिर केली गेली आहे.
९) आयटीआय मध्ये इलेकट्रिशियन ट्रेड किती वर्षयाचा आहे?
आयटीआय मध्ये इलेकट्रिशियन ट्रेड हा दोन वर्षाचा आहे.
१०) आयटीआय मध्ये अप्रेंटिसशिप किती वर्ष्याची असते?
आयटीआय मध्ये अप्रेंटिसशिप एक वर्ष्याची असते.