IBPS PO Prelims Result Declared 2023 - IBPS PO पूर्व परीक्षा 2023 निकाल जाहीर! येथून करा डाउनलोड

IBPS PO PRE-EXAM RESULT 2023

IBPS मार्फत तब्बल 3049 जागांची भरती निघाली होती. हि भरती Probationary Officer या पदाकरिता होती.  या भरती संदर्भात पूर्व परीक्षा ही 23 व 30 सप्टेंबर 2023 रोजी घेतली गेली होती. आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेत बसण्याची संधी दिली जाणार आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली संबंधीत माहिती दिली आहे.

IBPS PO Mains Exam Date 2023 

IBPS PO साठी मुख्य परीक्षा ही 05 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भात हॉल तिकीट हे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. तर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी जोरात सुरु ठेवा यश तुमचच असेल. 


How to Download IBPS PO Prelims Result 2023/IBPS PO पूर्व परीक्षा 2023 निकाल कसा डाउनलोड करावा?

  • सर्वात आधी खाली दिलेल्या निकाल डाउनलोड च्या लिंक ला भेट द्या.
  • आता तुमच्या समोर लॉगिन पेज उघडणार 
  • आता आपला Registration Number किंवा Roll Number टाका.
  • आता Registration केल्यावर मिळालेला पासवर्ड टाका किंवा जन्म तारीख टाका
  • जन्म तारीख टाकायची असल्यास DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरा.
  • उदा. तुमचा जन्म 01 जानेवारी 2001 ला झाला असल्यास पासवर्ड हा 01-01-01 असा टाकावा
  • आता खाली दिलेला Captcha भरा
  • आता सबमिट बटनावर क्लीक करा
  • आता तुमच्या समोर निकाल उपलब्ध होईल. त्याला प्रिंट करा.


IBPS PO Prelims Result Download 2023

IBPS PO Prelims Result Download Link - Click Here 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url