DTP Maharashtra Peon Group-D Exam Pattern And Syllabus PDF 2023
DTP Maharashtra PA Exam Pattern And Syllabus PDF 2023: महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्यमापन विभागाने १२५ पदांसाठी शिपाई (गट-ड) परीक्षा अधिसूचना प्रकाशित केली होती. यासाठी डीटीपी महाराष्ट्र ऑनलाइन परीक्षा घेणार आहे. तुम्हाला DTP Peon Group-D परीक्षेचा अभ्यासक्रम मिळेल. नगररचना आणि मूल्यमापन विभाग महाराष्ट्र विषयनिहाय परीक्षा अभ्यासक्रम तसेच निवड प्रक्रिया येथे दिली आहे. अधिकृत सूचनेनुसार, DTP शिपाई (गट-ड) परीक्षेत 200 गुणांसाठी 100 प्रश्न असतात. संपूर्ण DTP शिपाई (गट-ड) परीक्षा अभ्यासक्रम, DTP शिपाई (गट-ड) निवड प्रक्रिया, DTP शिपाई (गट-ड) परीक्षा स्तर दिलेला आहे, DTP Maharashtra Peon Group-D परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम PDF डाउनलोड करण्यासाठी संबधीत माहिती खाली दिली आहे. www.newjobupdate27.com
DTP Peon Group-D Exam Pattern 2023
DTP Peon Group-D Exam Pattern 2023: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. या भरती साठी ऑनलाईन परिक्षा (Computer based test) शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2023. रोजी राज्यातील विविध शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. परिक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
DTP Peon Group-D Syllabus 2023
DTP Peon Group-D Syllabus 2023: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदा करीत खालील प्रमाणे DTP Peon Group-D या पदाचा अभ्यासक्रम आहे.
DTP Maharashtra Bharti Exam Pattern 2023
- ऑनलाईन परीक्षा एकूण २०० गुणांची (प्रत्येकी २ गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे १०० प्रश्न) घेतली जाईल.
- त्यापैकी तांत्रिक प्रश्नांसाठी ८० गुण व मराठी + इंग्रजी + सामान्यज्ञान + बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास ३० गुण याप्रमाणे १२० गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
- सदर ऑनलाईन परीक्षा ही रचना सहायक पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व २ तासांची असेल.
- प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा.
- प्रत्येक योग्य उत्तरासाठी २ गुण व प्रत्येक चूकीच्या उत्तराबाबत एकूण २ गुणांच्या १/३ म्हणजेच ०.६६ गुण वजा याप्रमाणे परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धत (Negative Marking System) अवलंबिली जाईल.
- समान गुण मिळालेल्या उमेदवारांबाबत शासनाने निर्गत केलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल.
Maximum Marks Required for DTP Maharashtra Exam 2023
- पात्रतेकरिता सर्व संवर्गातील उमेदवारांनी किमान ९० गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
Newjobupdate27.com
महत्वाच्या सूचना |
DTP Peon Group-D 2023 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारां आत्ता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..! |